Ad will apear here
Next
मुंबई व ठाणे वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजपच अव्वल!


मुंबई: राज्यातील 10 महापालिकांपैकी 8 महापालिकांमध्ये भाजपने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेने आपले स्थान कायम ठेवले आहे. भाजपने मुंबई आणि ठाणे सोडून नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती आदी महापालिकांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबई महापालिकेत भाजपला चांगले यश मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे केवळ 31 च नगरसेवक होते. पण शिवसेनेने युती तोडल्यानंतर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. सध्या भाजपचे 77 जागांवर आघाडी मिळवली आहे.

मुंबईजवळच्याच उल्हासनगर महापालिकेत भाजपची सरशी झाली आहे. या निवडणुकीत भाजपने पप्पू कलानी यांच्यासोबत आघाडी केल्याने, भाजपवर चहूबाजूंनी टीका होत होती. पण इथे भाजपची सरशी होऊन भाजप आघाडीला 33 जागांवर विजयी आघाडी मिळाला आहे. तर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या नाशिक महापालिकेत भाजपने राज ठाकरेंच्या मनसेकडून सत्ता अक्षरश: हिसकावून घेतली आहे. गेल्या निवडणुकीत नाशिक महापालिकेत मनसेचे 40 तर भाजपचे केवळ 14 नगरसेवक होते. पण यंदा भाजपने 40 जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे. तर मनसेच्या सध्या तीनच उमेदवारांनी आघाडी मिळवली आहे.

भाजपने सर्वाधिक मुसंडी ही पुणे महापालिकेत मारल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेमध्ये भाजपचे फक्त 26 च नगरसेवक होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपने 77 जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे. पुण्यात सध्या भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार धोबीपछाड दिला आहे. भाजपचे गेल्या महापालिका निवडणुकीत केवळ 3 नगरसेवक होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपने सध्या 31 जागांवर आघाडी मिळवली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर महापालिकेतही भाजपने कॉंग्रेसचा दणकून पराभव केला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण या निवडणुकीत भाजपने 28 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर कॉंग्रेसचे 11 उमेदवार आघाडीवर आहेत. तिकडे विदर्भातही भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. नागपूर महापालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. पण भाजपने आपले पुन्हा एकदा नागपूर महापालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत 62 जागांवर विजय मिळवला होता. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपने 48 जागांवर आघाडी मिळवली आहे. यासोबतच अमरावती महापालिकेवरही भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. सध्या भाजपने 30 जागांवर आघाडी मिळवलेली आहे. तसेच अकोला महापालिकेतही भाजपला यश मिळाले आहे. भाजपने 36 जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NWKRAZ
Similar Posts
निकालः मतमोजणीला सुरुवात, भाजपच्या बाजूने कल राज्यात 16 आणि 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. याचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी घेण्यात आले होते. झेडपी आणि पंचायत समितीचा निकाल काही तासातच? सकाळी 10 वाजल्यापासून महानगरपालिका, जिल्हा
मुंबईतील कॉंग्रेसच्या पराभवास निरूपम जबाबदार -राणे मुंबई : राज्यात सध्या पालिका निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंतच्या परिस्थितीनुसार शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच टक्‍कर होताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईत कॉंग्रेसच्या पराभवास संजय निरूपमच जबाबदार असल्याची जोरदार टीका कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. दरम्यान, त्यांच्या या टीकेमुळे
ठाणे महापालिकेत आत्तापर्यंत विजयी झालेले उमेदवार ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये 131 जागांपैकी 55 जागांचे निकाल लागले आहेत. यापैकी 35 जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे, तर भाजप, राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ आणि एमआयएमला दोन जागा मिळवण्यात यश आलं आहे. ठाणे विजयी उमेदवार शिवसेना * साधना जोशी * नम्रता घरत * नरेश मणेरा * सिद्धार्थ ओवळेकर * नंदिनी
216 विजयी उमेदवारांचे आभार दौरे सुरू गावागावात उमेदवारांचे सत्कार सोहळे गट, गणात विकास करण्याचे देताहेत आश्‍वासन नगर, दि. 25 (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी शनिवारपासून आभार दौरा सुरू केला असल्याचे चित्र दिसत आहे. मतदान करून विजयी करण्याची विनंती उमेदवारांकडून मतदारांकडे वारंवार केली जात होती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language